जळगाव मिरर / ०३ फेब्रुवारी २०२३
राज्यातील यंदाची दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च काळात पार पडणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी असून परीक्षेचं हॉलतिकीट कधी मिळणार याची तारीख जाहीर झाली आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च पासून सुरु होत आहे. त्यामुळं परीक्षेला आता केवळ एकच महिना शिल्लक असताना हॉलतिकीट कधी मिळणार याची विद्यार्थ्यांना उत्सुकता होती.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हॉलतिकीटाची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार, ६ फेब्रुवारीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट उपलब्ध होणार आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना ते डाऊनलोड करता येईल.