जळगाव मिरर | ९ मार्च २०२४
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना नेहमी घडत आहे. यात अनेक घटना प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून उघडकीस येत असतांना नुकतेच नाशिक शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकलहरा गेटजवळील नवीन सामनगाव येथे शरीरसुखाच्या मागणीसाठी भाच्यानेच मामीचा चाकूने गळा चिरून निघृण खून करत स्वतःच्याही गळ्यावर चाकूने वार करून बनाव केल्याचे तपासामध्ये उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिली. भाच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकलहरा गेट नवीन सामनगाव येथे सुदाम रामसिंह बनोरिया हे पत्नी क्रांती (२७), मुले आयुष (७), खुशी (४), पीयूष (२) यांच्यासह राहतात. वर्षभरापासून सुदाम यांचा भाचा अभिषेक राजेंद्र सिंह (२२) हा राहण्यास आला होता. बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जखमी अभिषेक याच्या ओरडण्याच्या आवाजामुळे शेजारी राजेंद्र पाटील घराजवळ गेले असता क्रांती ही खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी भाचा अभिषेकची चौकशी केली असता त्याने रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर मामी क्रांती हिच्यासोबत शरीरसुखाच्या मागणीवरून भांडण झाल्याचे सांगितले. क्रांती हिने नकार दिल्याने अभिषेकने सोबत आणलेल्या चाकूने तिचा गळा चिरून निघृण खून केल्याची कबुली दिली.