जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२४
श्री गणेश विसर्जन अवघ्या काही दिवसांवर आलेले आहे त्या पार्श्वभूमीवर श्री विसर्जन मार्ग व विसर्जन स्थळ यांची आज दि.१२ रोजी संध्याकाळी जिल्हा प्रशासन व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे पाहणी करण्यात आली त्यात उंच मूर्त्यांसाठी रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या विद्युत तारा, झाडांच्या फांद्या तसेच रस्त्यातील मोठे खड्डे, त्यासोबतच विसर्जन स्थळ असलेल्या मेहरून तलाव येथे विसर्जनासाठी तराफे, क्रेन, विद्युत रोषणाई ची व्यवस्था या संदर्भातील नियोजनाच्या उद्देशाने विविध विभागांना जिल्हा प्रशासनातर्फे सूचना देण्यात आल्या.
या प्रसंगी जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, म.न.पा आयुक्त श्री ज्ञानेश्वर ढेरे, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री सचिन नारळे, श्री किशोर भोसले, पोलिस उपअधीक्षक श्री संदीप गावित, जळगाव शहरातील विविध पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षकासमवेत गोपनीय विभागाचे कर्मचारी,सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे किशोर देशमुख, समन्वयक सूरज दायमा, राहुल परकाळे, धनंजय चौधरी, भूषण शिंपी, सुजय चौधरी, राहुल पाटील, नीरज पाटील, श्रेयस पाटील, प्रतीक कापडणे यांच्यासह आदी मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.