
जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून गेल्या तीन दिवसापूर्वी भाजपने पहिली यादी जाहीर केली यात जळगाव जिल्ह्यातील ५ जागा जाहीर केल्या असून दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेची अद्याप पहिली यादी जाहीर न झाल्याने अनेक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
जळगाव जिल्ह्यात राजकीय धुमाकूळ सुरु झाला असून भाजपच्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील पाच जागेवर उमेदवारी जाहीर झाली आहे. यात केवळ रावेर विधानसभा मतदार संघासाठी भाजपने नवा चेहरा दिला असून बाकी ४ ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. तर नुकतेच दि.२१ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुक्ताईनगर येथून आ.चंद्रकांत पाटील यांची देखील उमेदवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. मात्र मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाची हि जागा भाजपची असून भाजपने हि जागा शिंदे सेनेला सोडली असली तरी आता जिल्ह्यातील बाकी ठिकाणी म्हणजेच पाचोरा येथे भाजपचे अमोल शिंदे हे उमेदवारी भाजपला मिळावी म्हणून आग्रही असून याठिकाणी जर भाजपने जागा मागितली तर शिंदे सेनेला मोठी अडचण होवू शकते. त्यानंतर जळगाव ग्रामीण हा मतदार संघ नेहमीच शिवसेनेकडे राहिला आहे तर एरंडोल पारोळा मतदार संघात देखील शिवसेनेचा उमेदवार नेहमी असतो. तर चोपडा मतदार संघावर देखील शिवसेनेचाच उमेदवार नेहमी असतो. केवळ पाचोरा – भडगाव मतदार संघातच भाजपच्या नेत्यांची उमेदवारीची मागणी असल्याने शिंदेंच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.