
जळगाव मिरर | ११ मे २०२६
जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व जैन स्पोर्टस अकॅडमीच्या सहकार्यातून स्व. डॉ. घनश्याम कोचुरे यांच्या जयंती निमित्तीने जिल्हा मानांकन स्पर्धा दि. ९ ते १० मे दरम्यान कांताई सभागृह येथे घेण्यात आली. दोन दिवस चालेल्या या स्पर्धेत ४५ च्यावर खेळाडूंनी सहभाग घेतला. आठ खेळाडूंनी क्वार्टर फायनलमध्ये पोहचवले होते. त्यातून जैन इरिगेशनचा आंतराष्ट्रीय कॅरमपटू योगेश धोंगडे चॅम्पियन ठरला. त्याने रईस शेखचा २५-१२, १६-१९, २१-१५ असा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. विजेत्यांना तब्बल १५ हजारांची रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी डॉ. घनश्याम कोचुरे मेडिकल फाऊंडेशनचे पराग कोचुरे, जैन स्पोर्टस अकॅडमीचे अरविंद देशपांडे, हबीब इंजीनियर, सैयद मोहसिन, आसिफ शेख उपस्थित होते. पराग कोचुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कॅरम खेळाडूंसाठी जैन स्पोर्टस अकॅडमीने उपलब्ध करुन दिलेले व्यासपीठ खूप मोलाचे आहे. यातून चांगले खेळाडू घडत असून उत्कृष्ट खेळ बघायला मिळाला. यावेळी अरविंद देशपांडे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जैन स्पोर्टस अकॅडमी नेहमी अग्रेसर असल्याचे सांगितले.
दरम्यान स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी अॅड. रेखा कोचुरे, तेजस कोचुरे, मंजूर खान यांच्या मान्यवर उपस्थित होते. उपांत्यपूर्व फेरी मध्ये योगेश धोंगडे विरूद्ध अफजल शेख, अयाज शेख विरूद्ध अय्युब खान, नईम अन्सारी विरूद्ध फिरोज खान, मुस्तूफा खान विरूद्ध रईस शेख असे सामने झालेत. उपांत्य फेरीमध्ये योगेश धोंगडे विरूद्ध अयुब खान, रईस शेख विरुद्ध फिरोज खान यांच्या सामना रंगला. फायनल ही योगेश धोंगडे व रईस शेख यांच्यात झाली. यशस्वी झालेल्यांचे कौतूक जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राधेशाम कोगटा, व सरकार्यवाह नितिन बरडे यांच्यासह मान्यवरांनी केले.






















