
जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२३
जळगाव शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर कृत्य सुरु असतांना पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई करीत आहे. तर नुकतेच शहरातील एका परिसरात लॉजचा कुठलाही परवाना नसताना त्याठिकाणी वेश्या व्यवसायासाठी रूम उपलब्ध करून देणाऱ्या दोन जणावर एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एका ठिकाणी लॉजचा कुठलाही परवाना नसताना संशयित आरोपी सागर सोनवणे व शाम बोरसे या दोघांनी पश्चिम बंगाल राज्यातील पाच तरुणी 3 डिसेंबरच्या सायंकाळी या लॉजमध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.