जळगाव मिरर । २६ जानेवारी २०२३ ।
जळगाव जिल्ह्यातील गेल्या काही दिवसापासून अल्पवयीन मुलीसह महिलेवर अत्याचारचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. नुकतीच भडगाव येथे दि २५ रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर आता जामनेर तालुका विवाहितेच्या अत्याचाराने हादरला आहे. २० वर्षीय विवाहित तरुणीला धमकी देत व तिच्या फोटोचा धाक दाखवीत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या २० विवाहित तरुणीला संशयित आरोपी जीवन अंबादास दांडगे यांनी दि ३ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान विवाहितेला तिच्या फोटोचा धाक दाखवीत व तुझ्या पतीसह तुझ्या वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी संशयित आरोपी जीवन अंबादास दांडगे (वय २३, रा.डाभा, ता.सोयगाव जि.औरगाबाद ) याच्या विरोधात पहूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी संदीप चेडे हे करीत आहेत.