जळगाव मिरर | १५ जुलै २०२४
यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून अनेक ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना वही-पुस्तके भेटली आहे तर काहीना अद्याप भेटली नसल्याने जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वही वाटपाचा कार्यक्रम आज दि.१५ जुलै २०२४ पासून सुरु झाले आहे.
शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरातील जिजामाता माध्यमिक विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांना वही वाटप माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक योगेश संतोषराव पवार, सागर भारुडे, कविता पाटील, प्रशांत चौधरी, रुकसाना तडवी, पूजा बागुल, मंगला महाजन, कल्पिता कोरे, शैलेंद्र सोनवणे, आकाश पारधे, मनोज चव्हाण, धीरज हिवराळे आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आजपासून शहरातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना डॉ.अश्विन शांताराम सोनवणे हे स्वतःहा विद्यार्थ्यांना वही वाटप करणार आहे. जेणेकरून गोरगरीब विध्यार्थी देखील शालेय शिक्षण घेवून प्रगती करू शकतो हाच ध्यास त्यांनी मनाशी बाळगला आहे. या उपक्रमाचे शाळेतील शिक्षकांनी कौतुक केले आहे.