जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२४
स्वातंत्र्य असंख्य वीरांच्या त्याग आणि बलिदानामुळेच शक्य झाले असल्याने देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशन व प्रतिभा प्राथमिक,माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कंजरभाट समाज मंदिराच्या पटांगणात साजरा करण्यात आले सकाळी ७:०० वाजता प्रतिभा शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी भारत माता की जय ,वंदे मातरम् घोषणा देण्यात आले.
त्याऩतर प्रतिभा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एस. बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका नंदा पाटील व कंजरभाट समाजाचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिभा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता ९ वी च्या विद्यार्थिनींनी माय भुमी हे देशभक्तीपर गीत सादर केले तसेच संगीतमय कवायत, पहिलीच्या विद्यार्थि यांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या कडकडाने प्रशंसा मिळवली.
या प्रसंगी कंजरभाट समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक बिरजू नेतलेकर,विजय दहियेकर,मोहन चव्हाण फाउंडेशचे अध्यक्ष विजय अभंगे,उपाध्यक्ष सचिन बाटूंगे,सचिव राहुल नेतलेकर,कार्याध्यक्ष शशिकांत बागडे,संतोष रायचंदे,नरेश बागडे,मोहन गारुंगे, योगेश बागडे, प्रदीप नेतलेकर,संदीप बागडे,जयेश माछरे,कार्तिक बाटूंगे,अनिल नेतलेकर,संदीप गारुंगे,पंकज गागडे,वीर दहियेकर, उमेश माछरे,मंगल गुमाने,राहुल दहियेकर,निलेश बागडे, नितीन बाटूंगे,संदीप अभंगे, गोपाल बाटूंगे संतोष बागडे,सोनू रायचंदे,क्रांती बाटूंगे,गौतम बागडे,विजय बागडे,संतोष बागडे,तसेच महिला अध्यक्ष दीपमाला बाटूंगे, प्रतिभा प्राथमिक विद्यालयाच्या कुलकर्णी मॅडम, संजय पाटील,मनीषा भिरुड, वैशाली चंदनकर, छाया पाटील, स्वाती भदाणे, शोभा बच्छाव, वैशाली पाटील, नफिसा तडवी, माया भालेराव, विश्वनाथ वाघ, सचिन चिते, गजानन सपकाळ, मनीषा पाटील, यशोदा गागडे, सुमित माछरे, गणेश बागडे, राज नेतलेकर, आदी समाजबांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश बागडे यांनी तर आभार प्रतिभा शाळेचे श्री सपकाळ यांनी मानले शिक्षक ,शिक्षिका,कर्मचारी वृंद उपस्थित होते.