जळगाव मिरर | ४ नोव्हेबर २०२४
अखिल भारतीय सफाई मजदूर संघ ( ट्रेड यूनियन) तर्फे जळगाव शहराच्या पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे राष्ट्रीय महासचिव अमर गोयर यांची उपस्थिती होती.
जळगाव शहरात नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व करण विजय जावळे यांची अखिल भारतीय सफाई मजदूर संघ जळगाव शहरअध्यक्ष पदावर नियुक्ति पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे. करण जावळे यांच्या नियुक्तीबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.