जळगाव मिरर | १९ जून २०२४
राज्याच्या राजकारणात बारामती नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला असतो. आता देखील पवार परिवारातील दोन राष्ट्रवादीत बारामती कुणाची यावर चर्चा सुरु असतांना पुन्हा एकदा शरद पवार गटाच्या खा.सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केले आहे.
बारामतीमध्ये युगेंद्र पवार हे नवीन दादा होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कारण यापूर्वीवाद तोच दादा नवा अशा आशयाचे बॅनर बारामतीमध्ये झळकले होते. त्यावर युगेंद्र पवार यांचा फोटो होता. आता याबाबत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केले आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या युवेंद्र पवार तीन चार वर्षापासून बारामतीत फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
याबाबत बोलतांना सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे की, ”युवेंद्र पवार गेली तीन चार वर्षापासून बारामतीत फिरत आहेत. त्यांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये चांगलं काम आहे. स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवत आहेत. लोकांची ते काम करत आहेत. त्यांना उमेदवारी दिली जाणार की नाही याबाबत चर्चा फार लवकर होत आहे. मात्र तरीही याबाबत वरिष्ठ काय तो निर्णय घेतील. बघूया पुढे काय होतं”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तसेच आमदार रोहित पवार आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वादावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”हे सगळं मीडिया क्रिएटेड आहे. समज गैरसमजातून होणाऱ्या बातम्या आहेत. याच्यावर कोणीही जबाबदार व्यक्तींनी भाष्य करू नये. शब्दाला शब्द वापरला जातो आणि चुकीची माहिती अनेक वेळा उत्सुकतेभरात बाहेर येत असते. आता एकच लक्ष आहे विधानसभा… गांभीर्याने निवडणूक घेतली पाहिजे”, असे सुप्रिया सुळे म्हणल्या.