
जळगाव मिरर | १२ एप्रिल २०२५
शासकीय कार्यालयात कामे करण्यासाठी अधिकारी व कर्मचारीकडून लाच घेण्याचे प्रमाण वाढत असतांना आता एसीबीने जळगाव शहर पोलीस स्थानकात सापळा लावत दोन पोलीस हवालदार यांना ताब्यात घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस अंमलदाराने २० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तो कर्मचारी ठाणे अंमलदाराच्या ड्युटीवर असतांना त्याला २० हजाराची लाच स्विकारताना लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. शहर पोलिस ठाण्यात झालेल्या या कारवाईने पोलिस दलातील काही निवडक कर्मचाऱ्यांमुळे ‘खाकी’ डागाळली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिसात दाखल असलेल्या गुन्हयात तक्रारदाराला मदत करण्यासाठी पोलिस अंमलदाराने २० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदाराला लाच दयायची नसल्याने त्याने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने सापळा रचला होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास ड्युटी बदलल्यानंतर ड्युटीवर ठाणे अंमलदार हजर झाला. त्यानंतर तक्रारदाराकडून अंमलदाराला २० हजाराची लाच स्विकारली. तक्रारदाराने इशारा केल्यानंतर सापळा रचलेल्या एसीबीच्या पथकाने त्या पोलिसाला लाचेची रक्कम घेतांना रंगेहाथ पकडले. या कारवाई पोलीस हवालदार रविंद्र प्रभाकर सोनार व धनराज निकुभ यांना अटक करण्यात आली आहे. पथकाने लाचखोर अंमलदारासह एका पोलिस कर्मचाऱ्याला चौकशीसाठी घेवून गेले असुन रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
लाच लुचपत विभागाचे पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे, पोउपनिरी सुरेश पाटील चालक पोहेकॉ रविंद्र घुगे पोहेकॉ जनार्दन चौधरी चालक पोहेकॉ सुनिल वानखेडे पोना/ बाळू मराठे, पो. कॉ/राकेश दुसाने यांनी हि कारवाई यशस्वी केली.