अमळनेर ः विक्की उत्तम जाधव
तालुक्यातील एका गावातून १५ वर्षीय मुलीस मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने पळवून लावल्याप्रकरणी मारवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तालुक्यातील तांदळी येथील गावातून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि.25 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने अल्पवयीन मुलीस तिच्या घरातून पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या आईने मारवड पोलिस स्थानकात दि.31 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.सचिन निकम हे करीत आहेत.