जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२४
राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात अनेक अल्पवयीन मुली व तरुणीना लग्नाचे आमिष देत अपहरण व अत्याचाराच्या अनेक घटना नेहमीच उघडकीस येत असतांना एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगरातून समोर आली आहे.याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळुज एमआयडीसीमध्ये एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दोन परिचारिका काम करत होत्या. त्याच हॉस्पीटलमध्ये काम करणाऱ्या दोन तरूणांनी त्याचं अपहरण केलं आहे, अशी तक्रार या मुलींच्या नातेवाईकांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. या दोघी बहिणी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी रुग्णालयात कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना काळजी वाटू लागली. काळजीपोटी त्यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांना त्या दोघीही कामासाठी आल्याच नाही, असं समजलं. त्यानंतर नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडाली.
दरम्यान रुग्णालयात काम करणारे इरफान व मुसा हे दोघे सुद्धा गायब असल्याचं त्यांना समजलं. त्यामुळे या दोघांनी त्यांचं अपहरण केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहे. अपहरण केलेल्या तरूणींचा शोधही घेतला जात आहे. अपहरण झालेल्या दोन्ही परिचारीका मावस बहिणी आहेत. यातील एक मुलगी अल्पवयीन आहे. या प्रेमीयुगुलांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. इरफान व मुसा या दोघांनी त्यांच अपहरण केल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. इरफान व मुसा या दोघांनी अपहरण केलेल्या परिचारिकांना पळवून जाऊन लग्न करण्याचं आमिष दाखवलं. या दोघी बहिणी त्यांच्या आमिषाला बळी पडल्या. त्यांनी या तरूणांसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला, असं त्यांच्या नातेवाईकांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे.