जळगाव मिरर | 25 ऑगस्ट 2026
तालुक्यातील शिरसोली येथील बारी नगरातील रहिवासी भूषण रवींद्र खलसे (क्य २५) हा बेपत्ता तरुण सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नेव्हरे धरणात मृत अवस्थेत आढळून आला. भूषण रविवारी सकाळी ८ वाजेपासून घरातून बेपत्ता होता. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही.

सोमवारी सायंकाळी नेव्हरे धरण परिसरात त्याची दुचाकी, मोबाइल व घड्याळ आढळून आले. शंका आल्याने धरणाच्या पाण्यात शोध घेतला असता भूषणचा मृतदेह मिळून आला. याबाबत पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवला. हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात या दोन्ही बाजूंनी एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भूषणच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे





















