जळगाव मिरर | २५ जून २०२३
राज्यात अनेक उद्योजक मोठा संघर्ष करून यशस्वी होत असतात पण यशस्वी झाल्यावर त्यांच्या समोर येणाऱ्या काही संकटांना तोंड देत असतांना मानसिक स्थिती खराब झाल्याने टोकाचे पाऊल नेहमी अनेक लोक उचलत असतात, तशीच एक घटना राज्यातील कोल्हापूर शहरात घडल्याने कोल्हापूर हादरून गेले आहे.
कोल्हापुरातील प्रसिद्ध अर्जुन उद्योग समूहाचे संचालक व तरुण उद्योजक म्हणून नाव असलेले संतोष वसंत शिंदे (वय ४६) यांनी पत्नी तेजस्विनी शिंदे (वय ३६) व मुलगा अर्जुन शिंदे (वय १४) या दोघांना विष दिल्यानंतर स्वतः विष घेत चाकूने दोघांचा व स्वताचा गळा चिरून घेत बेडरूममध्ये तिघांची जीवनयात्रा संपविली आहे. हि घटना दि. २४ रोजी शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये बेळगाव पोलिसात बलात्काराचा गुन्हा गडहिंग्लज येथील माजी नगरसेविकेने शिंदे यांच्याविरुद्ध दाखल केला होता. याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न ते करीत होते. परंतु मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळेच त्यांनी हे कृत्य केल्याची चर्चा घटनास्थळी होती. प्रतिकूल परिस्थितीत शाखेची पदवी घेतलेल्या संतोष यांनी दहा वर्षांपूर्वी हसूरचंपू येथे अर्जुन रिफायनरी नावाने खाद्यतेल निर्मितीचा कारखाना सुरू केला होता. पुणे, मुंबईसह कोकणातही त्यांच्या खाद्यतेलाला मोठी मागणी होती.
घटनास्थळी पोलिसांना डायरी सापडली आहे. त्यात लिहिलेल्या ‘सुसाइड नोटमध्ये ‘त्या’ माजी नगरसेविकेसह चौघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याची चर्चा होती. त्यामुळे जमलेल्या लोकानी ‘त्या’ चौघांच्या अटकेच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. व्यापारी आणि व्यावसायिकांनीही दिवसभर बंद पाळला. विज्ञान बेकरी उत्पादनांचा प्रकल्प आणि अर्जुन फिटनेस नावाने अत्याधुनिक व्यायामशाळाही सुरू केली होती. कोट्यवधींची वार्षिक उलाढाल असलेल्या त्यांच्या समूहामुळे हजारो कुटुंबांना रोजगार मिळाला होता. त्यांच्या अकाली जाण्याने अनेक कुटुंबे विराज फूड्स नावाने सुमारे ४०० उघड्यावर पडली.