
जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
दि. 3 जानेवारी 2025 रोजी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगावतर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका पूजनाने साजरी करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्यां जयंतीचे औचित्य साधून महानगरपालिका शाळा क्रमांक 5 पोलीस लाईन जळगाव येथे विद्यार्थीनींना शालेय शैक्षणिक साहित्य सोबत खाऊ वाटप करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक विचार विद्यार्थिनींच्या मनामनात रुजण्यासाठी अध्यक्षा सौ मनीषा पाटील यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक. सौ मनीषा नेरकर , नामदेव उखंडे, गौरव गुजराती व शिक्षक वृंद उपस्थीत होतें सूत्रसंचलन. माधुरी शिंपी यांनी केले तर आभार. हर्षा गुजराती. यांनी मानले