जळगाव मिरर / १७ एप्रिल २०२३ ।
दि १६ रोजी पोलीस भरती परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केमिस्ट भवन जवळील टार्गेट अभ्यासिका येथे आयोजित करण्यात आला होता. शहरातील क्षितिज फाउंडेशन तर्फे टार्गेट अभ्यासिका मधील विद्यार्थी अनिकेत दिपक पाटील (मीरा भाईंदर), मयुर संजय लाडवंजारी ( मीरा भाईंदर), अजय संजय शेवरे (ठाणे ग्रामीण पोलिस) यांची पोलीस भरती मध्ये निवड झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, यांची उपस्थिती होती.
तसेच प्रमुख अतिथी म्हणून जी.जे.इंटरनॅशनल स्कूलचे संचालक सुरेशसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ तायडे, मंगेश बेडिस्कर हे होते. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनदंन केले व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष टार्गेट अभ्यासिकेचे संचालक गजानन वंजारी, सागर सानप, विशाल नवले, गोपाल भोई, धिरज नाईक, सचिन ब्रम्हांदे, विशाल कोळी, मोहित जोशी, लोकेश वाघ,निलेश गारुंगे, सुमित वाघ, जयेश घुगे पाटील, अनंत ढाकने, तसेच रोशनी भारंबे, प्रियंका खैरनार, दिपाली काटकर उपस्थित होते.यावेळी राणी चव्हाण या विद्यार्थीनीने सूत्रसंचलन केले तर गजानन वंजारी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.