जळगाव मिरर । २२ जानेवारी २०२३ ।
पाचोरा पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी वावडदा रस्त्यावरील पुलाजवळून अटक केली आहे. रोशन ओंकार साळुंके (२३, रा. शाहू कॉलनी, पाचोरा) व तेजस प्रदीप पाटील (२०, रा. जयराम कॉलनी, पाचोरा) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
दोन्ही संशयित गुन्हा घडल्यापासून फरार होते. अखेर दोघं वावडदा रस्त्यावरील पुलाजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनंतर पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे अक्रम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रितम पाटील, सचिन महाजन यांनी वावडदा रस्त्यावरील पूल गाठून दोन्ही संशयितांना अटक केली.