जळगाव मिरर / २२ मार्च २०२३
चोपडा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील ट्रक थांबवून लूटमार केल्याप्रकरणी ५ दरोडेखोरांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी २२ मार्च रोजी सकाळी ९ वाजता जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातून अटक घेतली आहे. अटकेतील पाचही जणांना चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार ट्रक थांबवून लूटमार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, अकरम शेख, महेश महाजन, परेश महाजन, रवींद्र पाटील, अविनाश देवरे, दीपक शिंदे तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे, शेषराव थोरे, प्रमोद पाटील, संतोष पारधी, प्रमोद पवार यांनी धडक कारवाई करत जळगाव शहरातील गेंदलाल मिल परिसरातून संशयित आरोपी नवाबख खान गुलाब खान (वय-३२) रा. शिवाजीनगर, जळगाव, शाहरुख खान शाबीर खान (वय-३०) रा. गेंदलाल मिल जळगाव, सौरभ भुवनेश्वर लांजेवार (वय-३५) रा. रायपूर, जळगाव, जावेद खान नसीर खान (वय-३२) रा. गेंदालाल मिल आणि प्रदीप राधेश्याम रायपुरिया (वय-३४) रा. गेंदालाल मील,जळगाव यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी पाचही संशयित आरोपींना चोपडा शहर पोलीस ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
