अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात व्याख्यान पार पडले.
यावेळी परिषदेच्या जिल्हाध्यक्षा सौ. वैशाली शरद शेवाळे यांनी स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघा आणि ते पुर्ण करण्यासाठी जिद्दीने पेटुन उठा या विषयावर व्याख्यान दिले. असंख्य विद्यार्थीनी यावेळी उपस्थित होत्या. तसेच ग्रामीण भागात देखील विवीध गावांमध्ये प्रबोधन परिषदेच्या वतीने राजमाता जिजाऊ व विवेकानंदाचे पुजन व माल्यार्पण करण्यात आले. टाकरखेडा येथे ग्राम अध्यक्ष किशोर पाटील, ढेकु खु॥ येथे ग्राम अध्यक्ष किरण जाधव, रणाईचे येथे ग्राम अध्यक्ष समाधान पाटील, मांडळ येथे ग्राम अध्यक्ष वाघ, बहादरवाडी येथे ग्राम अध्यक्ष प्रेमसिंग पाटील, दहिवद येथे ग्राम अध्यक्ष भागवत सोनवणे आदींनी पुजन केले. यावेळी गावातील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित
होते.