जळगाव मिरर | १७ नोव्हेबर २०२३
देशभरातील अनेक लोकांच्या बँकेच्या खात्यात लाखो रुपये तांत्रिक चुकीमुळे आल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. पण सध्या एका खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले? अनेकांचा यावर विश्वासच बसणार नाही. काहींसाठी हा फार मोठा धक्का असेल. एका तांत्रिक चुकीमुळे युको बँकेच्या काही खात्यांमध्ये तब्बल ८२० कोटी रुपये जमा झाले. हा प्रकार लक्षात येताच बँकेने तत्काळ कार्यवाही करत ६४९ कोटी रुपये वसूल केले आहेत.
युको बँकेने शेअर बाजार नियमक ‘सेबी’ला यासंदर्भात माहिती दिली आहे. युको बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. ‘आयएमपीएस’ या तत्काळ अदायगी सेवेद्वारे काही खात्यांमध्ये पैसे जमा झाले. ‘आयएमपीएस’चे व्यवस्थापन ‘एनपीसीआय’ तर्फे करण्यात येते. मोठी रक्कम खात्यांमध्ये जमा झाल्याचे लक्षात येताच बँकेने आयएमपीएस सेवा तात्पुरती रोखून ठेवली. त्यामुळे अनेक ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येत नव्हता. याशिवाय या सेवेद्वारे इतर बँकांतूनही पैसे युको बँकेच्या खात्यात जमा होत नव्हते.