जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२४
चाळीसगाव तालुक्यातील एका १९ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. प्रेमसंबंध असलेल्या तरुणाशी लग्न करून देण्याची मागणी करणाऱ्या मुलीला अल्पवयीन असल्याने वडिलांनी नकार दिला. मात्र त्यानंतर देखील तरुणासोबत पळून गेल्यानंतर लक्ष्मण आण्णा मोरे (वय १९) या तरुणाने मुलीवर अत्याचार केला. या दोघांना रविवारी मेहुणबारे पोलिसांनी अटक केली, त्या तरुणाला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तामसवाडी येथील लक्ष्मण मोरे याच्यासोबत प्रेमसंबंधत होते. त्यामुळे मुलीने तिच्या वडिलांकडे त्या तरुणासोबत लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने वडिलांनी तिच्या लग्नाला नकार दिला. त्या वेळी दोघांनी पळून जावून लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो मुलगा अल्पवयीन मुलीला घेवून दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सटाना येथे पळून जात याठिकाणी एका शेतात वास्तव्यास होते याठिकाणी तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.
त्यानंतर रविवारी दोघांना मेहुणबारे पोलिसांनी तामसवाडी येथून अटक केली. सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणात मुलीच्या जबाबावरून बलात्कार, पोस्को कलम वाढविण्यात आले. दरम्यान, लक्ष्मण मोरे याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे नीलेश चौधरी यांनी बाजू मांडली.