जळगाव मिरर | २३ जुलै २०२४
राज्यातील पुण्याच्या मावळमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका प्रेयसीचा गर्भपाता दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेनंतर संतापलेल्या प्रियकराने तिच्या दोन मुलांना चक्क नदीत फेकल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेच्या तब्बल 13 दिवसानंतर याचा उलगडा झाला असून या प्रकरणी आता पोलिसांनी प्रियकर आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आहे. यामुळे पुणे शहरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.९ जुलै रोजी हि घटना घडली असून खरं तर प्रियकराचा मित्र रविकांत गायकवाड हा गर्भवती महिलेला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षाच्या मुलासह घेऊन कळंबोळीला आला होता. कळंबोळीतील अमर हॉस्पिटलमध्ये या महिलेचा गर्भपात करण्यात आला आहे. मात्र या गर्भपाता दरम्यान 8 जुलैला (प्रेयसीचा) महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेच्या मदतीने रविकांत गायकवाड गर्भवती महिलेचा मृतदेह आणि तिच्या दोन मुलांना घेऊन मावळमध्ये पोहोचला होता. 9 जुलैच्या रात्री अंधाराचा फायदा घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैरने मित्र रविकांत गायकवाडसह इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात गर्भवती महिलेचा सोडून दिला. ही संपूर्ण घटना मृत महिलेची दोन्ही मुलं आपल्या डोळ्यांनी पाहत होते. त्यामुळे आई आपल्यापासून दुरावल्याचे पाहून त्यांनी देखील रडायला सुरूवात केली. त्यामुळे आपले बिंग फुटेल या भितीने गजेंद्र तिच्या दोन मुलांवर कोणतीही दया माया न दाखवता त्यांना इंद्रायणी नदीत फेकून दिले होते.
दरम्यान या सर्व घटनेनंतर दोन्ही आरोपी काही घडलंच नाही अशाप्रकारे वावरू लागले होते. तर तिकडे मृत महिलेच्या कुटुंबियांनी आरल्या मुलीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आपल्या मुलीशी संपर्क होत नसल्याच्या कारणाने काळजीपोटी कुटुंबियांनी तळेगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवली होती. त्यामुळे पोलीस प्रियकर गजेंद्र दगडखैर पर्यंत पोहोचली होती.
दरम्यान गजेंद्रची चौकशी केली असता गजेंद्रने अनेकदा प्रेयसीला फोन कॉल केल्याचे आणि त्याच दरम्यान मित्र गायकवाडलाही अनेकदा फोन कॉल केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पोलिसांनी मित्रालाही देखील ताब्यात घेतले आणि दोघांची कसून चौकशी सुरु केली होती. मात्र दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली होती. अखेर पोलीसी खाक्या दाखवताच दोघांनी घटनेचा उलगला केला. या घटनेने आता पुणे हादरले आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी गजेंद्र दगडखैर आणि रविकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिकचा तपास सुरु आहे.