जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२४
लाडक्या बाप्पाचे नुकतेच आगमन झाले असून जळगाव शहरात मोठ्या आनंदाचा उत्सव सुरू असताना जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील खडके चाळ बहुउद्देशीय संस्था संचलित श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ११ हजार १११ दिव्यांची महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील दूध फेडरेशन रोडवर असलेल्या खडकेचा येथे श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील लाडक्या बाप्पा समोर ११ हजार १११ दिव्यांची महाआरती करण्याचे नियोजन मंडळांनी केले आहे. ही महाआरती दिनांक ११ सप्टेंबर बुधवार रोजी सायंकाळी साडेसात वाजता होणार आहे या मारतीस शहरातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे तरी परिसरातील गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.