जळगाव मिरर / १० एप्रिल २०२३
जळगाव शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाही क्रांतीसुर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समाजबांधवांतर्फे आयोजित करण्यात आला आहे.

दि.21 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी 10 वा. शहरातील काव्यरत्नावली चौकात महात्मा बसवेश्वर यांच्या वचन साहित्याचे माहिती फलकाचे महापौर जयश्रीताई महाजन व नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे तर दि.22 रोजी सायंकाळी 5 वा. शहरातील नुतन मराठा महाविद्यालयासमारील रोझ गार्डनपासून भव्य मिरवणूकीला प्रारंभ होत मिरवणूक नेहरु चौकमार्गे टॉवर चौक-चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणूकीची सांगता होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजुमामा भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांची उपस्थिती लाभणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन महात्मा बसवेश्वर लिंगायत समाज बहुउद्देशिय संस्था व जळगाव शहर सर्व समाजबांधवांतर्फे करण्यात आले आहे.




















