जळगाव मिरर / २३ मार्च २०२३
महावीर जन्मकल्याणाक महोत्सवानिमित्त जळगाव शहरात वर्षानुवर्षे विविध कार्यक्रम सकल जैन संघ तर्फे आयोजित करण्यात येत असतात. महोत्सवानिमित्त शहरात भव्य शोभा यात्रा सुद्धा काढण्यात येते. सन २०१९ पासून या भव्य शोभायात्रेत जैन समाजातील युवक व युवतींचा जैन युवा ढोल पथक सुद्धा सहभागी होऊन पारंपरिक वेशभूषेत ढोल व ताश्याची प्रस्तुतीत देत असतात.

या वर्षी या पथकात १३७ युवक व युवती असून खान्देश सेंट्रल मॉल येथे सराव सुरु आहे. या पथकाला माजी मंत्री सुरेशदादा जैन, सकाळ जैन समाजाचे अध्यक्ष दलिचंद जैन, जैन इर्रिगेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, भगवान महावीर जन्मकल्याणाक महोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद ठोले, प्रदीप रायसोनी, स्वरूप लुंकड, रजनीकांत कोठारी, सुमतीलाल टाटीया यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.




















