
जळगाव मिरर | राजकीय विशेष
राज्यात महायुती व महाविकास आघाडी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपापल्या पक्षातर्फे तगडे उमेदवार देऊन दोन्ही युती-आघाडी एकमेकांना विधानसभेच्या मैदानात चीतपट करण्यासाठी सज्ज झाली असताना जळगाव जिल्ह्यात मात्र अनेक मतदारसंघात अपक्ष व बंडखोरांमुळे युती व आघाडीतील तगड्या उमेदवारांची आता डोकेदुखी वाढली आहे.
जळगाव जिल्ह्यात ११ विधानसभा मतदार संघ असून या मतदार संघात महायुती व महाविकास आघाडीचे गणित ठरले असून त्यानुसार तगडे उमेदवार मैदानात उतरविण्यासाठी युती व आघाडी सज्ज झाली आहे. मात्र या ११ मतदार संघात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये बंडखोरी झाल्यामुळे अनेक नेते अपक्ष उमेदवारी करीत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतील तगड्या उमेदवारांना विजय मिळविण्यापासून बंडखोर व अपक्ष उमेदवार कोसोदूर टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.