
जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२३
गेल्या काही वर्षापासून छोट्या छोट्या कारणाने अनेकानी वेगवेगळ्या पद्धतीने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सातत्याने घडत आहे. यातच पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर वर्षभरात त्याने दुसरे लग्न केले. दुसऱ्या महिलेबरोबर लग्न केले पण घर नावावर करून देण्यासाठी होत असलेल्या छळामुळे ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर येथील विठ्ठलनगरातील लक्ष्मी कॉलनी येथील रहिवासी विलास गणबा लगड असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा सागर लगड (३२) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुजाता गुरव (५०) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार फक्त सुजाता गुरवच आहे, अशी चिठ्ठी लिहून गळफास घेत असल्याचा व्हिडीओही त्यांनी रेकॉर्ड केला आहे. विलास लगड यांनी किंग्ज लॉज येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी दुपारी उघडकीस आले. त्यांची पहिली पत्नी ललिता लगड यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर गेल्या वर्षी लगड यांनी सुजाता गुरव हिच्याबरोबर दुसरा विवाह केला. त्यांचा मुलगा फिर्यादी याने त्यांना वरच्या मजल्यावर राहण्यास फ्लॅट दिला. दिला. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी सुजाता हे घर आपल्या नावावर करण्यासाठी त्रास देऊ लागली. गेल्या आठ दिवसांपासून यावरून त्यांच्यात वादावादीही झाली होती.





















