अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील मंगळग्रह मंदिराविषयी मला जास्त अवगत नव्हते मात्र महाराष्ट्रातून कर्नाटकात येणारी आजवर अनेक वाहनांना या मंदिराचे स्टिकर पाहिले होते. आज खान्देश दौऱ्यावर असताना मंगळ ग्रह देवतेचे दर्शनाने मी भारावलो अशी प्रतिक्रिया कर्नाटक राज्याचे भाजपचे माजी मंत्री अरविंद निंबाळकर यांनी दिली.
मोदी @९ या मोहिमेर्गत घर संवाद मोहीम राज्यात राबविली जात आहे. या मोहिमेचे प्रमुख कर्नाटक राज्याचे भाजपाचे माजीमंत्री अरविंद निंबाळकर जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. सोमवारी अमळनेर, धरणगाव याठिकाणी जाऊन मोदी सरकारच्या नऊ वर्ष काळातील विकास कामे व कल्याणकारी योजनाची माहिती घरोघरी जाऊन नागरिकांना दिली. यावेळी खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. राधेश्याम चौधरी, ऍड. व्ही. आर. पाटील, भैरवी वाघ, महेश पाटील, शीतल देशमुख, हिरालाल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी माजीमंत्री निंबाळकर यांचा मंदिराचे सचिव सुरेश बाविस्कर, उपाध्यक्ष एस. ऍन. पाटील, खजिदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त आनंद महाले आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराचे सचिव सुरेश बाविस्कर यांनी मंदिरा विषयी माहिती दिली.