जळगाव मिरर । ३ फेब्रुवारी २०२३।
जिल्ह्यात सध्या चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरु असून पोलीस देखील दोन दिवसात या चोरट्यांना बेड्या ठोकीत आहे. नुकतेच धरणगाव शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरने कमालच केली ज्या हॉटेलमध्ये काम करीत होता तीच हॉटेल त्याने मध्यरात्री फोडली आहे. हा वेटर जळगाव येथील असल्याचे कळते. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव शहरातील गणेश नगरातील रहिवासी असलेले किशोर चौधरी यांच्या मालकीची शहरात हॉटेल चंदन नावाने परमीट रूम व बिअर बार आहे. दि २८ जानेवारी रोजी य हॉटेलमध्ये कार्यरत असलेला वेटर व संशयित आरोपी विजयसिंग शेरसिंग ठाकूर(रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव ) हा दुपारी ४ वाजेपासून तर ३० रोजीच्या सकाळच्या वेळेत हॉटेलच्या खिडकीचे ग्रील तोडत हॉटेलच्या काऊटरमधील ३० हजाराची रोकड लंपास केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.राजेद्र कोळी हे करीत आहेत.