जळगाव मिरर | २३ मे २०२३
शहरातील छत्रपती शिवाजी नगरात असलेल्या एका बगीचा परिसरातून चोरट्यांनी तब्बल ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील मुघल गार्डनच्या पुढील भागात दि १९ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास ४१ हजार ५०० रुपये किमतीची धातूचे वीज तार तर ६५०० रुपये किमतीचा १ वीज खांब अनोळखी इसमाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाचे शिवाजी नगर कार्यालयाचे सहाय्यक अभियंता हर्षल इंगळे यांनी शहर पोलिसात धाव घेत चोरीची तक्रार नोंद केली आहे. पुढील तपास पोना.योगेश पाटील हे करीत आहेत.