• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वैद्यकीय क्षेत्र हादरले : पोलीस निरीक्षकाने केला चार वेळा अत्याचार : महिला डॉक्टरने सुसाईट नोट लिहित संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 25, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
वैद्यकीय क्षेत्र हादरले : पोलीस निरीक्षकाने केला चार वेळा अत्याचार : महिला डॉक्टरने सुसाईट नोट लिहित संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२५

राज्यातील सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. येथील कार्यरत महिला डॉक्टर यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना समजताच रुग्णालयातील सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली. आपल्या कर्तव्यनिष्ठ आणि रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या डॉक्टरने असे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिकांपासून वैद्यकीय संघटनांपर्यंत सर्व स्तरांवर या घटनेबाबत दुःख आणि संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून डॉ या पोलिस आणि आरोग्य विभागातील प्रशासकीय वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. या कालावधीत त्यांना प्रचंड मानसिक ताणाचा सामना करावा लागत होता, अशी माहिती सहकारी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. संबंधित चौकशी दरम्यान त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार केली होती.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मृत डॉक्टर  यांच्या हातावर थेट सुसाईड नोट आढळली असून, त्यात त्यांनी दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर यांनी मला सतत मानसिक त्रास दिला. या धक्कादायक खुलाशामुळे सातारा जिल्ह्यात आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर काही काळ पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू होती. त्याच दरम्यान त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. घटनेची माहिती मिळताच उच्च पदस्थ पोलिस अधिकारी फलटण येथे दाखल झाले असून, सुसाईड नोटच्या हस्ताक्षराची तपासणी, तसेच डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या आरोपांची पडताळणी सुरू आहे. या प्रकरणात आरोपी पोलिसांवर बलात्कार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. डॉ.यांच्या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट असून, महिला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, डॉ यांनी यापूर्वीही या प्रकरणी तक्रार केल्याचे समजते. त्यात माझ्यावर अन्याय होत आहे, मला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांनी त्या पत्रात नमूद केले होते. मात्र, त्यांच्या या पत्राची दखल घेतली गेली नसल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे अखेरीस त्यांनी निराशेतून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाची नोंद फलटण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस या घटनेचा सर्वांगीण तपास करत आहेत. आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा सखोल तपास सुरू आहे. या बाबत तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीतील दबाव, प्रशासकीय ताण किंवा वैयक्तिक कारण, हे तपासानंतर स्पष्ट होईल. या घटनेनंतर आरोग्य विभागातही हालचाली सुरू झाल्या असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group