जळगाव मिरर | २४ जुलै २०२४
गेल्या काही दिवसापासून जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे हे शहरातील प्रत्येक शाळेत जावून वही वाटप करीत असतांना आज खोटे नगर परिसरातील उत्कर्ष मतिमंद विद्यालयात वही वाटप करण्यासाठी गेले असता. त्यांना आज वेगळाच अनुभव आला. या शाळेतील मतिमंद मुलांनी केलेल्या कार्यशाळा बघून त्यांचे कौतुक देखील डॉ.सोनवणे यांनी केले.
शहरातील खोटे नगर परिसरातील इन्स्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड सोशल सर्व्हिसेस जळगांव संचालित उत्कर्ष मतिमंद विद्यालय व प्रौढ मतिमंद मुलांची सरंक्षित कार्यशाळा जळगांव या विशेष मुलांच्या शाळेत व कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य वह्या माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पंकज भंगाळे, संस्थेचे उपाध्यक्ष एम.एन. महाजन, शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय बोरसे सर व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन शिक्षक श्री.राहुल पाटील यांनी केले. यावेळी डॉ.अश्विन सोनवणे यांनी कार्यशाळेस सदिच्छा भेट देत विध्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते राखी बनवणे कौशल्य पाहून डॉ.सोनवणे भारावून गेले. त्यांनी कार्यशाळेतील चरखा व लूम युनिट,फाईल बनविणे,बस्कर युनिट ह्याला भेट दिली. विद्यार्थ्यांच्या हस्ते कार्यशाळेत तयार करण्यात आलेले दिवाळीचे दिवे डॉ.सोनवणे यांना भेट दिली तर कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ.सोनवणे यांना राखी बांधून आपल्या भावना प्रकट केल्या. यावेळी माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे भारावून गेले होते. यावेळी त्यांनी शाळेला चित्रमय करण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे देखील जाहीर केले तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शुभेच्छा दिल्या.