
जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२५
मुक्ताईनगर तालुक्यात हलखेडा येथे मुक्ताईनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १७ जानेवारीला मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून ५ सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीन्सुअर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेवून अटक करण्याविषयी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार तसेच काढण्यात आलेल्या गोपनिय माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात कुऱ्हा दुरक्षेत्र अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पो.नि. बबन आव्हाड यांच्या कडील ४ अधिकारी, २० अंमलदार, क्यूआरटी पथक, उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय व मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांची ५पथके तयार करण्यात आली होती. या पथकांव्दारे हलखेडा, मधापुरी या गावात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यादरम्यान हलखेडा येथील समिर हकिम पवार, देश नरविलाल पवार, हकिम रफिक पवार, निखिल सवलत पवार व योगेश अंजूर पवार यांना अटक करण्यात आली. या सर्व आरोपींवर मुक्ताईनगर, नांदुरा, जळगाव जामोद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड, पो.उ.नि. शरद बागल, पो.उ.नि. गणेश वाघमारे, पो. उ.नि. दत्तात्रट पोटे व त्यांचे सहकारी यांच्यासह मुक्ताईनगर येथील पो. नि. नागेश मोहिते, पो.उ.नि. नयन पाटील, पो.उ.नि. नीलेश गोसावी तसेच कुऱ्हा दुरक्षेत्राचे स. फौ. संतोष चौधरी, स. फौ. अश्पाक शेख, पो.हे. कॉ. संजय पवार, पो.ना. मोतीलाल बोरसे, पो.ना. प्रदिप इंगळे, पो.ना. संदिप वानखेडे, पो.अं. अनिल देवरे, रवींद्र धनगर, प्रशांत चौधरी, गोविंद सुरवाडे, गोविंदा पवार, सागर सावे, सुनील मोरे, प्रवीण जाधव, अंकुश बाविस्कर, अश्विनी बोदडे तसेच क्यूआरटी पथकाने केली.