जळगाव मिरर | १६ जुलै २०२३
राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांसह मंत्र्यांनी आज थेट शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय खळबळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर या नेत्यांची भेट झाल्यानंतर शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्या विधानाने सध्या राज्यात खळबळ माजली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मोठा धक्का बसू शकतो. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांचीही उपस्थिती होती.
बैठीनंतर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्ही शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले आणि सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शरद पवार काहीही बोलले नाहीत. परंतु आम्ही आमची बाजू मांडली आहे. त्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची एक बैठक वायबी सेंटरमध्ये झाली. त्या बैठकीनंतर बोलतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष सोडून गेलेल्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं विधान करुन ते माघारी परतले तर आनंदच होईल, असं म्हटलं आहे.