जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२५
राज्यभरात आज दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज दसरा सणाच्यानिमित्ताने अनेकांचा दसरा मेळावा साजरा होत आहे. आज भगवान गडावर मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळाव्यात जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या नऊ दिवसांत नवरात्रोत्सवात देवीची उपासना केली. जातीवादाचे, धर्मवादाचे राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळू दे, अशी प्रार्थना मी केली आहे. आज समाजाला एकत्र आणणे गरजेचे आहे, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे आहेत, अशी ग्वाही भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. आज विजयादशमीनिमित्त भगवानगडावर आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या.
सीमोलंघन ही एक परंपरा आहे. नैसर्गिक आपत्ती असूनही तुम्ही दसरा मेळावा यशस्वी केला, याबाबत मी तुमचे अभिनंदन करते.अत्यंत संघर्षाने उभा राहिलेला हा मेळावा आहे. दरवर्षी भगवान गडावरील मेळाव्याला राज्यातून गर्दी होते. हे सर्व लोक स्वत:हून आले आहेत.आज मराठवाड्यावर नैसर्गिक संकट आले तरी दसरा मेळाव्याची परंपरा आपण जपली आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
संघर्ष हा आपल्या वारशातूनच मिळालेला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या सारखाच माझाही संघर्ष सुरू आहे. मी कधीच जात पाहिलेली नाही. माणुसकी हाच माझा धर्म आहे, मराठवाड्यातील लोकांचे संसार वाहून गेले आहेत. लोकांचे दु:ख पाहून मी हेलावून गेले. मी माझ्या वेदना शब्दांत मांडू शकत नाही.नैसर्गिक आपत्तीत जाती-पातीचे बंध गळून पडले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या भाषणावेळी गर्दीतून जोरदार घोषणाबाजी होत होती. यावर दोघांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. पंकजा मुंडे म्हणाल्या की, तुम्ही भगवान गडाचा दसरा हिरावून घेतला आहे. आता मेळावाही हिवून घेताय असे वाटते. तुम्ही लोक शुद्धीवर नाही. तुम्हाला स्वत:च्या वर्तनाचील लाजा वाटली पाहिले. गोंधळ घालणार्यांनी कितीही माझ्या नावाच्या घोषणा दिल्या तरी तुम्ही पवित्र होणार नाही. अशा प्रकारची बेशिस्त मी यापूर्वी मेळाव्यात पाहिली नव्हती, अशा शब्दांत यांनी गोंधळ घालणार्यांना फटकारले.
नवरात्रोत्सवात आमच्या घरात मासांहार नाही की, कांदा-लसूण नाही. नऊ दिवस आम्ही देवीची पूजा केली. या देवींनी महिषासुर, रक्तबिजासारखा राक्षस संपवून टाकला आहे हे सांगताना त्यांनी आज रक्तबीजासारखा राक्षस जन्माला आलाय. तुमच्या मेंदूत जन्माला आला. चुकीच्या निर्णयातून, संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात. जातीचे राक्षस, धर्मवादाचे राक्षस आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले. तर देवीला प्रार्थना करते मला जातीवादी राक्षस, धर्मवादी राक्षस नष्ट करण्याची शक्ती दे, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.
महापुराच्या काळात मी बौद्ध समाजातील माणसाच्या घरी गेले. तर माझा वंजारा समाजाचा माणूस राशन घेऊन गेला. कैकाडी समाजाच्या कुटुंबाला राशन दिलं. यातून जाती गळून पडत आहे. मला आनंद आहे की, जाती गुंडाळून माणुसकीचा धागा जोडण्याचं काम आपण केलं. एक एकर जमीन विका पण शिका असे भगवान बाबा म्हणायचे. मी तुम्हाला आवाहन करते की दोन घास कमी खा. पण स्वाभिमानाने राहा. कुणाचे तुकडे उचलू नका. चांगल्या माणसाचं चांगलं होतंय. भगवान बाबांचे आशीर्वाद सोबत आहेत, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.