
जळगाव मिरर | २२ जून २०२६

अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असताना मागच्या दरवाजाने घरात घुसून दीपक प्रकाश निकम (वय ३५) याने या मुलीवर अत्याचार केला. ही घटना दि. ७एप्रिल रोजी तालुक्यातील एका गावात घडली. काही दिवसांच्या अंतराने त्याने पुन्हा हे कृत्य केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दि. २० जून रोजी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय तरुणी घरात एकटीच असताना दीपक निकम हा घराच्या मागच्या दरवाजाने घरात घुसला. मुलगी स्वयंपाक खोलीत काम करत असताना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिला तो दुसऱ्या खोलीत घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतरही त्याने मुलीशी अशीच जबरदस्ती करून अत्याचार केला. या प्रकरणी मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दीपक निकम याच्याविरुद्ध पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे. तपास उपनिरीक्षक राजश्री पाटील करीत आहेत.




















