जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५
देशातील अनेक राज्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतांना पंजाब राज्यातील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे (आप) आमदार गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागून मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास उघडकिस आली.
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आमदाराला तातडीने डीएमसी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिस उपायुक्त (डीसीपी) जसकरण सिंह तेजा यांनी सांगितले की, “ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आणि जेव्हा त्यांना डीएमसी रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.” गोगी २०२२ मध्ये आम आदमी पक्षात सामील झाले आणि लुधियाना विधानसभा निवडणुकीत दोन वेळा काँग्रेसचे माजी आमदार भारत भूषण आशु यांचा पराभव केला.
रात्री उशिरा, लुधियाना पश्चिमेतील आप आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचे गोळी लागून निधन झाले. गंभीर अवस्थेत त्यांना डीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डीएमसीच्या आपत्कालीन विभागातील डॉक्टर रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार करत होते, पण त्यांना वाचवता आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार गोगी एका कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतले होते आणि त्यांच्या खोलीत जेवण करत होते. यावेळी गोळीबाराचा आवाज ऐकू आला.गोगी यांचा आवाज ऐकून आमदाराच्या पत्नी डॉ. सुखचैन कौर ताबडतोब खोलीत गेल्या. तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्याला ताबडतोब डीएमसी रुग्णालयात नेण्यात आले. गोगीवर त्याच्याच परवानाधारक पिस्तूलने गोळीबार झाल्याचे मानले जात आहे. पण गोळी कोणत्या परिस्थितीत झाडण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.