जळगाव मिरर | २८ जुलै २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून परिवारातील भांडण चव्हाट्यावर येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरु असून नुकतेच पाचोरा तालुक्यातील एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या आईला न वागवता तिला सोडून मुलगा आणि सून निघून गेले होते. त्यानंतर महिलेने आईचा सांभाळ केला. आईने मुलीच्या नावे संपत्ती केली. त्याचा राग आल्याने भाऊ आणि वहिनी गावी परतले. त्यानंतर त्या वहिनीनेच पीडीत नणंदेला शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच गैरवर्तन केले. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वहिनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भावापासूनही जिविताला धोका असल्याची माहिती पिडीत महिलेने पोलिसांना दिली आहे.