जळगाव मिरर | १६ जुलै २०२६
शहरापासून नजीक असलेल्या शिरसोली येथे बुधवार दि.१५ जुलै रोजी सकाळी निवृत्ती गोकुळ बोबडे (वय २८) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. आई बोलविण्यासाठी गेली त्या वेळी तिला मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांना धक्कास बसला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका खासगी कंपनीत कामाला असलेला निवृत्ती बोबडे हा तरुण सकाळी गावात गेला होता. तेथून परत आल्यानंतर घराच्या वरील मजल्यावर गेला आणि त्याठिकाणी त्याने दोरी सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. मुलगा कोठे गेला म्हणून त्याची आई त्याला बोलवायला गेली असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्या वेळी आईला मोठा धक्का बसून तिची शुद्धच हरविली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी या विषयी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयताच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे




















