• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 30, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० मे २०२६ 

मुक्ताईनगर पोलीस ठाणे हद्दीत पहाटेच्या सुमारास बुलढाणा जिल्हा सीमेवरील पुलावर घडलेल्या किरकोळ अपघातातून पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा मोठा कट उधळून लावला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), दोन जिवंत काडतुसे, दोरी, लोखंडी रॉड, मोबाईल फोन तसेच बनावट क्रमांक प्लेट जप्त करण्यात आली आहे. तर वाहन चालकासह दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे सेकंड मोबाईल पथक पहाटेच्या वेळी नियमित गस्त घालत असताना बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पुलाजवळ एका स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ अपघात झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांना पाहताच वाहन चालकासह दोन जणांनी घटनास्थळावरून पलायन केले. मात्र वाहनात असलेल्या अन्य दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी त्यांच्या हालचालींबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी वाहनाची कसून झडती घेतली. झडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), दोन जिवंत काडतुसे, एक दोरी, लोखंडी रॉड, दोन मोबाईल फोन आणि बनावट क्रमांक प्लेट आढळून आली. त्यामुळे हे आरोपी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपासादरम्यान फरार झालेला वाहन चालक प्रशांत उर्फ परशुराम गायकवाड असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध बीड, अहमदनगर, बुलढाणा, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये तब्बल १८ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यास बीड कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे चंद्रकांत विष्णू वाघ व कैलास कारभारी घोडके अशी असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटक आरोपींकडे सखोल चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group