जळगाव मिरर | १४ नोव्हेबर २०२३
३० वर्षीय तरुणाचा रावेर तालुक्यातील निंबोल-ऐनपूर रस्त्यावरील एका शेतात अनोळखी इसमांनी खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि.१४ रोजी दुपारी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच निंभोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शेख अफजल शेख असलम (वय ३०, ऐनपूर, ता. रावेर) असे मयताचे नाव असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील निंबोल-ऐनपूर रस्त्यावरील एका शेतात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शेख अफजल या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. शेख अफजल याच्या डोक्यात दगड वा धारदार शस्त्र मारल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे तर शवविच्छेदन अहवालानंतर नेमका प्रकार समोर येणार आहे. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ व सहकार्यांसह जळगावहून फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.