
जळगाव मिरर | ३० जून २०२६

दिनांक 25 जून 2026 रोजी पत्रकारांशी संवाद साधताना ईशान्य मुंबईचे खासदार श्री. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्यावर मराठी पत्रकार संघातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष खंडू शेलोडे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी आणि पत्रकार बांधवांनी २९ जुन रोजी उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांच्याकडे निवेदन सादर करून खासदारांविरुद्ध तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की खासदारांच्या वक्तव्यामुळे पत्रकार बांधवांच्या भावना दुखावल्या असून पत्रकारांचा अपमान झाला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना सुरक्षित वातावरण आणि सन्मान मिळणे आवश्यक असून लोकप्रतिनिधींनी पत्रकारांबद्दल संयमित व जबाबदार भाषा वापरणे अपेक्षित आहे, असे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
याप्रसंगी पत्रकार मनोहर लोणे, शाम गोविंदा, कमलेश चौधरी, सुनिल आराक, जोएब सय्यद, आकाश ढाके, विनोद गोरधे, राजु चौधरी, किशोर सावळे, गोपी अण्णा ,कलीम पायलट सद्दाम खाटीक , रफिक खान ,नईम शेख ‘ किशोर शिंपी , प्रेम परदेशी आदी उपस्थित होते. या वेळी पत्रकार मनोहर लोणे, सुनिल आराक, राजु चौधरी आणि जोएब भाई यांनी मनोगतात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारने दक्षता घ्यावी असे सांगितले..
निवेदकांनी भविष्यात कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा व्यक्तीकडून पत्रकारांना धमकी, अवमान किंवा दडपशाही होणार नाही यासाठी आवश्यक ती सुरक्षा आणि उपाययोजना करुन पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी देण्याचीही मागणी केली आहे. मराठी पत्रकार संघाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कार्यवाही होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.




















