
जळगाव मिरर | ९ मे २०२३

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील एका कॉलनीतील अमृत योजनेची मुख्य जलवाहिनी पाईपावर एका मुरूम डंपर चालवून जात असतांना हि पाईप लाईन फुटल्याने याठिकाणी शेकडो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील प्रभाग क्र.१ मधील नवीन कानळदा रोडवर असलेल्या शिव शंकर कॉलनी रस्त्यावर असलेली अमृत योजनेची मुख्य पाईप लाईन आज दि ९ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास या परिसरातील रस्त्याचे काम येत्या काही दिवसात सुरु होत आहे. त्यासाठी एका ठिकाणी मुरूमचा ठिय्या टाकला जात आहे. याच मुरुमच्या डंपरने या मुख्य पाईप लाईन असलेल्या रस्त्यावर हे डंपर भरधाव वेगाने असल्याने ते त्याठिकाणी येवून अडकल्याने तेथील पाईप लाईन फुटली आहे. यामुळे या रस्त्यावर शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी एका नगरसेवकाच्या माणसाला फोन केला असता. त्यांनी या ठिकाणी मनपा कर्मचारी यांना पाठवून व्हाल बंद केल्याने या पाण्याची नासाडी तात्पुरती स्वरूपात थांबलेली आहे. या डंपरवर मनपा प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
प्रभागात विकास होणार पण आधी जनतेला त्रास होणार !
भविष्यात येणाऱ्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने प्रभागील नगरसेवकांनी आता पुन्हा एकदा गुडघ्याला बाशिंग बाधून रस्ते गटारी यासाठी पुढाकार घेत निवडणुकीच्या आधी हे काम पूर्णत्वास आणत श्रेय घेण्यासाठी धडपड सुरु आहे. पण हे विकास होतील तेव्हा होतील पण आज मात्र नागरिकांना या छोट्या मोठ्या घटनेचा त्रास मात्र सहन करावा लागत आहे. गेल्या चार वर्षात प्रभागात न फिरलेले नगरसेवक आता प्रभागात दिसू लागल्याने नागरिकांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले अशी चर्चा देखील होत आहे.





















