जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना तसेच स्पा सेंटरच्या नावाखाली नको ते उद्योग सुरु असल्याचे अनेक महिन्यापासून समोर येत असतांना अशाच एका प्रकरणांचा पोलिस उलगडा केला आहे. हि घटना पुण्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील पिंपरी-चिंचडवड स्पा सेंटर उघडून त्याच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले असून येथे पोलिसांनी कारवाई करून या स्पा सेंटरचा पर्दाफाश केला. छापा टाकून त्यांनी दोन पीडितांची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी अद्याप अधिक तपास सुरू आहे.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दि.२३ रोजी ही कारवाई केली. आकुर्डी येथील स्पा सेंटरवर छापा टाकत पोलिसांनी दोघींची सुटका केली. तर स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉल येथील ब्लू स्टोन्स स्पा येथे ही कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी राकेश शिंदे,अक्षय बनकर व एक महिला आरोपी अशा तिघांना बेड्या ठोकत अटक केली. तर दोन पिडीत तरूणींची या व्यवसायामधून सुटका केली.