जळगाव मिरर / १७ एप्रिल २०२३ ।
जळगाव शहरातील दुर्बल घटकांसाठी, वंचितांसाठी तसेच समाजासाठी सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव या संस्थेची नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली असून सन 2023-25. या कालावधी करिता निवड करण्यात आलेली आहे.
नवनियुक्त अध्यक्षपदी मनिषा किशोर पाटील , उपाध्यक्ष जयश्री सुनील महाजन, मंदा शंकरलाल सोनवणे, श्रीमती प्रतिक्षा मनोज पाटील, सौ विद्या धनंजय जकातदार, सचिव श्रीमती ज्योती लीलाधर राणे, सहसचिव श्रीमती किमया दयानंद पाटील, कोषाध्यक्ष एडवोकेट सीमा देवेंद्र सिंग जाधव, सह कोषाध्यक्ष नेहा संतोष जगताप, कार्याध्यक्ष नुतन दिलीप तासखेडकर, माधुरी प्रदीप शिंपी, सौ.संगीता मधुकर चौधरी, कायदेशीर सल्लागार एडवोकेट संगीता प्रदीप देशमुख, आशा विजयकुमार मौर्य, लीना चंद्रशेखर पाटील प्रसिद्धी प्रमुख कु.सोनम रविंद्र पाटील, अर्चना दत्तात्रय पाटील, शशी सुनील शर्मा, मरियम इस्माईल बुगडवाला, स्वागताध्यक्ष भारती अनिल कापडणे, भाग्यश्री गणेश महाजन, कांचन संजय पाटील, योगिता बबन बाविस्कर, संघटक रेणुका राजेश हिंगु, निता गोपाळराव वानखेडकर, राधिका आनंद पाटील, श्रावणी साईनाथ पाटील यांचा सहभाग आहे.
नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सामाजिक स्तरातून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे असे अध्यक्ष मनिषा पाटील यांनी कळविले आहे.