जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सोमवारी दिनांक २९ रोजी सकाळी ८ वाजता काव्यरत्नवली चौकातून किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल तर्फे इयत्ता १ ते इयत्ता ९ वी पर्यंतच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉनचे आयोजन केले होते.
या मॅरेथॉनमध्ये सुमारे ६५० विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून श्री कुमार चिंता, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, सचिव अमित जगताप, सौरभ कुलकर्णी यांची उपस्थिती होती. मॅरेथॉन यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाउंडेशनचे सहकार्य लाभले. सर्व कार्यक्रम किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल चे संचालक आदेश ललवानी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मीनल जैन, उपप्राचार्या ममता खोना, उपमुख्याध्यापिका (पूर्व प्राथमिक) कृती जैन, शैक्षणिक व्यवस्थापक मिलन साळवी, क्रीडा शिक्षक सागर सोनवणे, झहीर शेख, मेहुल इंगळे यांनी विशेष प्रयत्न केले.