
जळगाव मिरर | २७ मार्च २०२६
महाराष्ट्र गवळी समाज संघटना (रजि. नं. 549) च्या चाळीसगाव तालुका शाखेची नवी कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते निवडण्यात आली असून, या निवडीमुळे समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक २५ मार्च २०२६ रोजी चाळीसगाव येथे आयोजित गवळी समाजाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस गवळी समाजाचे वरिष्ठ मार्गदर्शक सुपाजी दाजीआप्पा पिरनाईक, नगरसेवक संभाजी शिवाजी घुले तसेच शिवाजी लक्ष्मण गवळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे संघटनेची तालुका शाखा मजबूत करण्याच्या दृष्टीने ही निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री व संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक भैय्यासाहेब हंसराजजी अहिर, प्रदेशाध्यक्ष हिरामण आप्पा गवळी, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतनाना नामागवळी तसेच युवा प्रदेशाध्यक्ष प्रवीणभाऊ हुंडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना कार्यरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात गवळी समाजाचे संघटन अधिक बळकट होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुक्याची नवी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आली आहे: अध्यक्ष : पैलवान सदाशिव केरुआप्पा निस्ताने (माजी नगरसेवक), उपाध्यक्ष : संभाजी शिवाजी घुले (नगरसेवक, चाळीसगाव न.पा.) सचिव : गुलाब गोविंद झारखंडे सहसचिव : भिकन शंकरराव हरबा खजिनदार : शिवाजी लक्ष्मण गवळी संपर्क प्रमुख : भिकन आनंदा चिपडे प्रसिद्धी प्रमुख : संदीप पिराजी गोडळकर सदस्य म्हणून सुपाजी दाजीआप्पा पिरनाईक (वरिष्ठ मार्गदर्शक), भिमाजी धोंडीबा उन्हाळे, विकी उमेश गवळी आणि सुभाष बाबुराव गवळी यांची निवड करण्यात आली आहे.
या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र गवळी समाज संघटना (549), जळगाव जिल्हा शाखेतर्फे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून समाजहिताचे व समाजसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे घडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. समाज संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी ही कार्यकारिणी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास समाज बांधवांनी व्यक्त केला आहे.





















