
जळगाव मिरर । १९ डिसेंबर २०२२
देशात गेल्या आठवड्यापासून शाहरूख खानचा ‘पठाण’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे तर दुसरीकडे हिंदू संघटनानी गाण्यातील काही सीन्सवर तसंच दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर आक्षेप घेत ते एडिट करण्याची मागणी केली होती. पण आता या वादात आरटीआयचे कार्यकर्ते दानिश खान यांनी उडी घेतली आहे. आता हे प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचलं आहे.
पठाण सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाणं रिलीज होऊन आता आठवडा उलटला,पण हा वाद काही थांबायचं नाव घेईना. रोज यावरनं नवं वादळ उठतंय. वेगवेगळ्या स्तरावरनं गाण्याला विरोध केला जात आहे. या गाण्यात दीपिका पदूकोण भगव्या रंगाची बिकिनी घालून शाहरुखसोबत रोमान्स करतान दिसत आहे. अनेक संघटनांना हेच खटकलं आहे. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर आणि गाण्यातील सीन्सवर आक्षेप घेत आरटीआयचे कार्यकर्ता दानिश खान हा आपल्या मुस्लिम धर्माचा देखील अपमान असल्याचं म्हणत आहेत.
आरटीआय कार्यकर्ता दानिश खान यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत ‘बेशरम रंग’ गाण्याला सिनेमातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की-”ज्याला लोक ‘भगवा रंग’ म्हणत आहेत, तो खरंतर मुस्लिम समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा रंग मुस्लिम समाजासाठी चिश्ति रंग आहे. तसंच, सिनेमातील या गाण्यातून देखील हिंदू-मुस्लिम यांच्यात फूट पाडण्याचे विचार बोलून दाखवले आहेत”.’बेशरम रंग’ गाण्यावर सामाजिक संघटनांनीच नाही तर राजकीय नेत्यांनीही आक्षेप घेतला आहे. सुरुवातीला हा मुद्दा उचलून धरला ते मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी. त्यांनी मध्यप्रदेशमध्ये सिनेमा रिलीज करून दिला जाणार नाही असा सज्जड दमही भरला होता. त्यानंतर अयोध्येच्या मंहतांनी तर ज्या थिएटरमध्ये सिनेमा लागेल ते जाळून खाक केले जाईल अशी धमकीच दिली. आता हिंदू संघटनां नंतर मुस्लिम संघटनांनी विरोध करत मोठा आक्षेप गाण्यावर घेतला आहे.’पठाण’ सिनेमा २५ जानेवारी,२०२3 रोजी रिलीज होत आहे. सिनेमात शाहरुख खान सोबत दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत आहेत.





















